आरोग्यगोंदियाविदर्भ

वयोवृद्धांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

४२ जणांची आयुर्वेदिक पद्धतीने तपासणी

गोंदिया : वृद्धांची काळजी घेणाऱ्यांना भेडसावणाऱ्या काही समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रुषा कार्यक्रम अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर, धापेवाडा येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर खोब्रागडे यांच्या कल्पक विचारातुन गावातील वयोवृद्ध व ज्येष्ठ लोकांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. सरपंच प्रकाश कटरे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

आयुर्वेदिक औषधे निसर्गातील घटकांपासून बनविलेली असल्याने ती सुरक्षित असतात, तसेच त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. योग्य मद्यपान, आहार आणि जीवनशैली तसेच हर्बल उपचारांद्वारे शरीर, मन आणि चेतना यांचे संतुलन राखून आजार रोखणे आणि त्यावर उपचार करणे हे आयुर्वेदाचे मूळ तत्व आहे. आहारावर भर देण्याबरोबरच, मसाज, ध्यान, श्वासोच्छवासाचे व्यायाम, योग आणि पंचकर्म आदी उपचार पद्धतींद्वारे रुग्णांवर उपचार केल्यास आजार व व्याधी मुळासकट निघुन जात असल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर खोब्रागडे यांनी याप्रसंगी दिली.

सर्वात प्रथम मान्यवरांच्या हस्ते माता धन्वंतरीचे पुजन करण्यात आले. शिबिरामध्ये वयोवृद्ध लोकांची आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबीन तपासणी सोबतच आयुष पद्ध्तीबाबत नस्य, जानुबस्ती, कटीबस्ती, स्वेदन, शिरोधारा स्नेहन ,अग्निकर्म या विविध पद्धतीचा वापर करुन तपासणी करण्यात आली. शिबीरादरम्यान 42 लोकांची आयुवेर्दीक पद्धतीने तपासणी करण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. गीतिका रहांगडाले, डॉ. विलास सिरसाटे, डॉ. शेफाली वैद्य यांचेसोबत आरोग्य सेविका नागपुरे व आशा सेविका यांनी आरोग्य सेवा प्रदान केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button