क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

दोन जहाल महिला नक्षल्यांनी केले आत्मसमर्पण

शासनाने जाहिर केले होते एकुण 16 लाख रूपयाचे बक्षिस

गडचिरोली : शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षलवाद्यांसह अनेक जहाल नक्षलवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 668 नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. 11 जूलै 2024 रोजी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई, (वय 36) रा. बोगाटोला (गजामेंढी), ता. धानोरा व अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती, (वय 34) रा. मरकेगाव ता. धानोरा अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते.

नक्षलवाद्यांच्या प्लाटून पार्टी कमिटी सदस्य व सप्लाय टीम/स्टाफ टीम म्हणून त्या दोघी काम करायच्या. प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई 2005 मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्य पदावर भरती होवून सन 2011 पर्यंत कार्यरत होती. 2011-14 मध्ये वैरागड दलममध्ये कार्यरत. 2014-15 मध्ये केकेडी (कुरखेडा, कोरची, देवरी) दलममध्ये कार्यरत. 2015 मध्ये कंपनी नं. 04 मध्ये बदली होऊन सन 2018 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत. 2018 मध्ये कंपनी नं. 04 मध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) म्हणून बढती होऊन सन 2021 पर्यंत कार्यरत. 2022 मध्ये डिके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये बदली होऊन पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) पदावर कार्यरत होती. तिच्यावर एकुण 40 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 20 चकमक, 02 जाळपोळ व 18-इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.

अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती 2010 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2013 पर्यंत कार्यरत होती. 2013-14 मध्ये प्लाटुन नं. 15 मध्ये सदस्य पदावर कार्यरत. 2014-15 मध्ये कंपनी नं. 04 मध्ये सदस्य पदावर कार्यरत. 2015 मध्ये डीके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये सदस्य पदावर कार्यरत. 2018 मध्ये डीके सप्लाय टिम/स्टाफ टिममध्ये पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य) पदावर बढती होऊन कार्यरत होती. तिच्यावर एकुण 07 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 02- चकमक, 04- खून व 01- इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाने प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई हिचेवर 08 लाख तर  अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती हिचेवर 08 लाख तसेच रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई हिला एकुण 05 लाख तसेच अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती हिला एकुण 05 लाख हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 21 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल व कमांण्डट 113 बटा. सिआरपीएफ जसवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button