गोंदियाविदर्भ

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून यंदा ४२ लाखांचा महसूल

२० टक्के पर्यटक वाढले ; अनेकांना मिळाला रोजगार

गोंदिया : जिल्ह्यातील नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच वाघांचे सहज दर्शन पर्यटकांना होऊ लागले आहे. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पाकडे यावर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले. त्यामुळेच मागील वर्षीच्या तुलनेत २० टक्के पर्यटक वाढले असून, वन्यजीव विभागाच्या महसुलातसुद्धा वाढ झाली आहे. पर्यटन वाढीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीसुद्धा वाढ झाली झाली आहे.

गोंदिया जिल्हा जंगलाने व्याप्त जिल्हा आहे. जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा सुरू असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी वन्यप्राणी पाहण्यासाठी येत असतात. या प्रकल्पामध्ये वाघ दिसत असल्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वन विभागामध्ये महसूलसुद्धा प्राप्त होत आहे. जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये एप्रिल, मे, जून या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे भेट देतात. गेल्या वर्षी १५ हजार पर्यटकांनी नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली होती.

यंदा पर्यटकांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली असून, १७ हजार ३३२ पर्यटकांनी या तीन महिन्यांमध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत महसुलामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button