गडचिरोलीविदर्भ

पांचाळ समाज सेवा समितीचा आराधना महोत्सव उत्साहात ; अम्ब्रीशराव आत्राम यांची उपस्थिती

अहेरी : येथील पांचाळ समाज सेवा समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीमद विराट पोतलुरी वीर ब्रम्हेन्द्र स्वामीजी यांच्या ‘आराधना महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली. त्यांनी भक्तिभावाने पूजा-अर्चा करून श्रीमद विराट पोतलुरी वीर ब्रम्हेन्द्र स्वामीजींचा आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची प्रगती व्हावी आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या दूर व्हाव्यात, अशी मनोभावे प्रार्थना केली.

कार्यक्रमादरम्यान श्रीमद विराट पोतलुरी वीर ब्रम्हेन्द्र स्वामीजी यांची प्राणप्रतिष्ठा, कलश यात्रा आणि मिरवणूक काढण्यात आली. यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, नंदू गणमुक्कुलवार, राजेश्वर रंगुलवार, प्रशांत गणमुक्कुलवार, नानाजी जक्कोजवार, शामला बेजनकीवार, अंजली कत्रोजवार आणि पांचाळ समाज मंदिर समितीचे पदाधिकारी, सदस्य, महिला वर्ग तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button