भंडाराविदर्भ

कालव्यात पडून चार वर्षीय बालकाचा मृत्यू

बेरोडी पुनर्वसन गावाजवळील घटना

भंडारा : तालुक्यातील बेरोडीपुनर्वसन गावालगत आई-वडीलांसोबत शेतात गेलेल्या चार वर्षीय बालकाचा कालव्यातील टाक्यात पडून करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना १७ जुलै रोजी दुपारी १ वाजतादरम्यान घडली. झाला. श्रेयांश शिवराम गायधने रा. बेरोडी पुनर्वसन, असे मृतक बालकाचे नाव आहे.

करचखेडा उपसा सिंचन योजनेचा कालवा बेरोडी पुनर्वसन गावाजवळून गेलेला आहे. गावातून कालव्यात पाईप टाकण्यात आले. पाईपमधील पाणी टाक्यात पडन पढे कालव्यात जातो. काही दिवसाअगोदर कालव्याला पाणी सोडण्यात आले. सिंचनाची सोय झाल्याने शिवराम गायधने या शेतकऱ्याने धान रोवणीला प्रारंभ केला. १७ जुलै रोजी धान रोवणीचे काम असल्याने चार वर्षीय बालक श्रेयांश हा आई-वडीलांसोबत शेतात गेला होता.

रोवणीचे काम सुरु असतांना खेळता-खेळता श्रेयाश कालव्याकडे गेला. अचानक कालव्यात असलेल्या टाक्यात पडल्याने करुण अंत झाला. मृतक हा एका इंग्रजी शाळेत नर्सरीमध्ये शिकत होता. घटना उघडकीस येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी तोबा गर्दी केली होती. माहिती मिळताच कारधाचे पोउपनि अरविंद मोहोड, पोशि प्रदिप गडदे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविले. त्याचे मृत्यूपश्चात आई-वडील, एक बहिण, असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

करचखेडा उपसा सिंचन योजनेच्या बेरोडी पुनर्वसन गावापर्यंत पाईप टाकण्यात आले. त्यानंतर कालवा तयार करण्यात आला. पाईपमधून पाणी टाक्यात पडतो. मात्र करचखेडा उपसा सिंचन प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे आज श्रेयांश नामक चार वर्षीय बालकाचा टाक्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. जर टाक्याला झाकण बसविण्यात आले असते तर आजची दुर्घटना टळली असती. त्यामुळे गावकऱ्यांत उपसा सिंचन प्रशासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात असून सदर टाक्यावर झाकण बसविण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button