
देसाईगंज : स्थानिक सिंधी कॉलनी येथील रहिवासी आणि गौरव एंटरप्रायझेसचे संचालक जितेंद्र परसवानी (वय 42) हे 10 जुलै रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास खरबी चौकाजवळील अपघातात गंभीर जखमी झाले होते. तर दिलीप परसवानी आणि मेहक परसवानी यांचा या अपघातात मृत्यू झाला. जितेंद्र परसवानी यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु होते. उपचारादरम्यान १७ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला.
जितेंद्र परसवानी त्यांच्या साध्या, आनंदी आणि मनमिळाऊ स्वभावासाठी परिसरात ओळखला जायचे. त्यांच्या निधनाच्या परिसरात शोककळा पसरली आहे.



