गडचिरोलीविदर्भ

काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना (उबाठा) ने केला निषेध

शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती

कुरखेडा : काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्याच्या निषेधार्थ शिवसेना आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात कुरखेडा येथे शिवसेना कार्यालय समोर वडसा रोड वर दहशतवादी हल्ल्याचा निषेध असो असे नारे लावून शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत निषेध करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष महेंद्र कुमार मोहबंसी, तालुका प्रमुख तथा गट नेता आशिष काळे, नगराध्यक्ष अनिता बोरकर, माजी नगरसेवक पुंडलीक देशमुख, न.प. सभापती अशोक कंगाली, नगरसेवक जयेंद्र चंदेल, नगरसेवक जयश्री रासेकर, नगरसेवीका कांता मट्टे, सोनू भट्टड, शेरू खान, चरण रासेकार, बजरंग बैस, मयूर रोकडे, शंकर कल्हारी, देवेंद्र मेश्राम, राजू मडावी, जगू बारसागडे, नीकेश हेटकर, शैलेश लाडे, तसेच शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button