गडचिरोलीविदर्भ

आ. डॉ. देवराव होळी यांनी‎ दिव्यांग बांधवाला केले सायकलचे वाटप

गडचिरोली : गोकुळनगर येथील मनोहर रामभाऊ गेडाम हे जन्मापासून दिव्यांग असून त्यांना शासकीय व वैयक्तिक कामासाठी ये-जा करण्यासाठी  सायकल नसल्याने अडचणीचे ठरत होते. ही बाब लक्षात घेऊन त्यांना ये-जा करणे सोईचे होण्याच्या दृष्टीने आमदार डॉ. देवराव होळी यांनी त्यांच्या घरी जाऊन सायकल भेट दिली.

याप्रसंगी टायगर ग्रुप अध्यक्ष दिपक बारसागडे, अरबाज शेख, कल्पक मोपिडवार, अंकुश कोडावले प्रमोद गडपायले, रक्षित पोटवार, कैलास खोब्रागडे, मिलिंद वनकर तथा वार्डातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button