गोंदियामुख्य बातमीविदर्भ

प्रेयसी करायची छळ ; ट्रेनच्या शौचालयात प्रियकराने घेतला गळफास घेतला

गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकावर एका तरुणाचा मृतदेह रेल्वेत सापडला आहे. रेल्वेच्या शौचालयात तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याची प्रेयसी त्याचा छळ करत होती, त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

गोंदिया रेल्वे पोलिसांना इंटरसिटी ट्रेनच्या शौचालयामध्ये एका तरुणाचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. तरुणाचा मृतदेह टॉवेलच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रवाशांनी याबाबत माहिती दिली, त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सध्या जगबंधू साहू उर्फ ​​जग्गू (वय २९) असे मृताचे नाव असून तो भिलाई येथील हाऊसिंग बोर्ड आवास परिसरात राहणारा आहे. तो भिलाई स्टील प्लांटमध्ये कंत्राटी मजूर म्हणून काम करायचा. नुकतीच त्याने पोलिस भरतीसाठी शारीरिक परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि त्याला लेखी परीक्षेला बसावे लागले होते.

कॉल डिटेल्स आणि व्हॉईस मेसेजच्या आधारे मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे की, त्याची मैत्रीण त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. जर त्याने लग्न केले नाही तर त्याच्यावर खोटा एफआयआर दाखल केला जाईल आणि त्याला पोलिसात नोकरी मिळू दिली जाणार नाही. या गोष्टींना कंटाळून त्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे. सध्या पोलीस हे पुरावे आणि आरोप तपासत आहेत. तपासानंतरच वस्तुस्थिती समोर येईल आणि त्यावर कारवाई होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हा तरुण त्याचा भाऊ आणि मित्रांसह भिलाई नगरमधील सेक्टर-6 मध्ये आयोजित एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेला होता. याच दरम्यान तो अचानक बेपत्ता झाला. मयत हा दोन दिवसांपासून बेपत्ता असून त्याच्या बेपत्ता झाल्याची नोंद भिलाई नगर पोलीस ठाण्यातही करण्यात आली होती. दरम्यान, इंटरसिटी ट्रेनच्या बाथरूममध्ये युवकाचा मृतदेह आढळल्याची माहिती गोंदिया रेल्वे पोलिसांनी भिलाई पोलीस ठाण्यात दिली.

मृत तरुण जगबंधू साहू उर्फ ​​जग्गू हा गेल्या 4 वर्षांपासून आपल्या मैत्रिणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी निश्चित केले. यानंतर जग्गूने प्रेयसीसोबतचे नाते संपवले. यानंतर त्याच्या मैत्रिणीनेही जग्गूच्या घरी जाऊन गोंधळ घातला. बेपत्ता होण्याच्या दोन दिवस आधी या तरुणाने घरच्यांशी लग्नाची चर्चा केली होती. या घटनेमागील प्रेमप्रकरणाची कहाणी समोर येत आहे. सध्या पोलिस कॉल डिटेल्स आणि व्हॉईस मेसेज तपासत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button