गडचिरोलीविदर्भ

अहेरी विधानसभा क्षेत्रातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – हनमंतू मडावी यांची मागणी

अहेरी : मागील काही दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात आणि अहेरी विधानसभा क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीने आणि पुरजन्य परिस्थितीमुळे विधानसभा क्षेत्रात शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन हवालदिल झालेल्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतु मडावी यांनी शासनाकडे केली आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद पडल्याने प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे तर काहींच्या दुकानात पाणी शिरले. तसेच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून असल्याने शेतकऱ्यांचेही पिकांचे नुकसान झाले आहे. याची दखल घेत आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतु मडावी यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्याच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button