
नागपूर : महावितरणच्या नागपूर प्रादेशिक संचालक पदाची सुत्रे परेश भागवत यांनी स्विकारली. भागवत याआधी महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात या मुख्य अभियंता या पदावर कार्यरत होते. प्रादेशिक संचालक या पदावर थेट निवड पद्धतीने त्यांची पदोन्नती झाली आहे. त्यांना विद्युत क्षेत्रात २७ वर्षे सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे.
नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि गोंदीया या पाच परिमंडलाचा समावेश आहे. परेश भागवत हे कोल्हापूरचे मुळ रहिवासी आहेत. त्यांनी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथून विद्युत आभियांत्रिकी शाखेत पदवी प्राप्त केली आहे. वित्त व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.



