
नागपूर : शासकीय मनुष्यबळ पुरवा करणाऱ्या कत्राटदारास कंत्राटदाराला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर शिक्षक म्हणून नियुक्तीपत्र देण्यासारी ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्याच्याविरुद्ध नागपुरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
नंदकिशोर पंजाबराव गवारकर असे लाचखोर शासकीय कंत्राटदाराचे नाव आहे. त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. नंदकिशोर गवारकर हा अभिजीत इंटेलिजन्स सिक्युरिटी अँड लेबर सप्लायर कंपनीचा संचालक आहे. त्याच्या कंपनीकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला कंत्राटी पध्दतीने प्रशिक्षक, कर्मचारी पुरविण्याचे शासकीय कंत्राट मिळाले आहे. तक्रारदार हा उच्चशिक्षित तरुण असून त्याची निवड नागभीड येथील औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेश पदावर झाली. मात्र, त्याला अद्यापर्यंत नियुक्तीपत्र देण्यात आले नाही.



