गडचिरोलीविदर्भ

निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करू नका – सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मागणी

तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

गडचिरोली : जिल्ह्यातील तात्पुरत्या शिक्षक भरती पदावर निवृत्त शिक्षकांना न घेता बेरोजगार पात्र मुलांना शिक्षण सेवक म्हणून संधी देण्यात यावी, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगारांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 15 जुलै 2024 रोजी आदेश काढून त्यात पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षकांच्या पदावर सेवा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. गडचिरोली जिल्हा मागास आहे. त्यातच बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले असताना डीएड, बीएड, एमएड, बीपीएड व पीएचडी झालेल्या बेरोजगार तरुणांना रोजगार दिला जात नाही. तर कार्यक्षमता कमजोर होते म्हणून 58 वर्षांच्या कर्मचाऱ्यांना आपण निवृत्त करता. आता शिक्षण हे अत्यंत मूलभूत आणि देशाचे भविष्य बनविणारी संस्था असून, निवृत्त कर्मचाऱ्यांना परत रिक्तपदावर घेण्याच्या सूचना करता, हे सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय करणारे नाही का? असा प्रश्न सर्व बेरोजगार विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य जनतेला पडला आहे. सदर बाब सुशिक्षित पात्र बेरोजगार तरुणांवर अन्याय करणारी आहे. आपण तातडीने यावर निर्णय घेऊन रिक्तपदावर सुशिक्षित बेरोजगार तरुणांची निवड करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदन देताना संजय गावडे, तुकेश नरोटे, प्रभाकर हलामी, राजेश परसा, नरेश हारामी, महेश कोवे, निकेश तुलाबी, सौरव हलामी, शीला आतला, इंदू गोवा यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button