क्राईमवर्धाविदर्भ

चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक ; ६.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगणघाट पोलिसांची कारवाई

वर्धा : चारचाकी वाहनातून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाने नाकेबंदी करून कारवाई केली. आरोपीच्या ताब्यातून वाहनासह दारूचा साठा, असा एकूण 6 लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर वॉर्ड हिंगणघाट येथे राहणारा हर्षल उर्फ बाब्या धोटेकर हा त्यांच्या साथीदारासह एमएच 02 बीजी 9815 क्रमांकाच्या चारचाकी वाहनामध्ये अवैधरित्या विदेशी दारूचा साठा विक्री करण्याचे उद्देशाने बाळगून रिठे कालनी, संत ज्ञानेश्वर वॉर्ड, येथे येत आहे, अशी माहिती मिळाली. रिठे कॉलनी, हिंगणघाट येथे नाकाबंदी केली असता अंधाराचा फायदा घेऊन गाडी सोडून वाहनचालक पसार झाला. चारचाकी वाहनांची तपासणी केली असता विदेशी दारूचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी वाहनासंह विदेशी दारूसाठा असा एकूण 6 लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

ही कारवाई पोलिस निरीक्षक मनोज गभने यांच्या आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनी अनिल आळंदे यांच्या मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोहवा अजहर खान, पो.ना राहुल साठे, पोशी आशिष नेवारे, पो.शि. विजय काळे, पोशी अमोल तिजारे, पोशी मंगेश वाघमारे, पोशी शिवशंकर यादव यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button