भंडाराविदर्भ

मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून 

साकोली-तुमसर मार्गावरील बससेवा बंद 

साकोली : साकोली-तुमसर मार्गावरील मक्कीटोला गावाजवळील नवनिर्माणाधिन पुलाजवळील जुना पुल २८ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात वाहून गेला. यामुळे या मार्गावरील बससेवा ठप्प पडल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

जिल्ह्यात सर्वत्र २८ जुलै रोजी मुसळधार व संततधार पावसाने थैमान घालून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले होते. सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण होवून नदी, नाल्यांना पूर आला. झालेल्या अतिवृष्टीमुळे साकोली तालुक्यातील साकोली-तुमसर मार्गावरील मक्कीटोला गावाजवळील नवनिर्माणाधिन पुलाच्या बाजूला असलेला जुना पुल वाहून गेला. सध्या नविन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने जुन्याच पुलावरून वाहतूक सुरू होती. वाहतूक सुरू असलेला पुल वाहून गेल्याने या मार्गावरील बससेवा ठप्प पडली आहे. साकोली व तुमसर या दोन तालुक्यांना जोडणारा हा राज्यमार्ग असल्याने या मार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ होती. परिणामी बससेवा बंद पडल्याने प्रवाश्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. शासन प्रशासनाने सदर नाल्यावर तात्पुरत्या पुलाची सोय करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button