क्राईमगोंदियाविदर्भ

गांजा तस्करी करणारे दोघे जेरबंद ; १२ किलो गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गोंदिया : जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरु आहेत. पोलिस प्रशासनाकडून अनेक अवैध प्रकारावर कारवाई करण्यात येत असली तरी, अवैध व्यवसायीकांनी यापासून बोध घेतलेला नाही. त्यातच २९ जुलै रोजी सुमारे २ लाख ७० हजार रुपये किंमतीचा १२ किलो १६० ग्रॅम गांजा तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच, पथकाने कारवाई करून मुद्देमालासह दोघांना अटक केली आहे. दिनेश विजयकांत मिश्रा (३८) रा. काका चौक सिव्हील लाईन, सोमेश्वर जोशीराम न्यायकरे (३६) रा. गिरोला, ता. गोंदिया असे आरोपींची नावे आहेत.

अवैध व्यवसायावर लगाम लागवा, यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत आहेत. त्यातच २९ जुलै रोजी पथकाला गोपनीया माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर दोन इसम हे ओडिसा येथून रायपुर मार्गे रेल्वेने गांजाची खेप घेवून गोंदिया मरारटोली येथे आले आहेत, त्या माहितीच्या आधारावर पथकाने मरारटोली बसस्थानक समोरील गोंदिया बालाघाट जाणाऱ्या मार्गावर सापळा रचून कारवाई केली. दरम्यान आरोपींच्या बॅगची तपासणी केली असता, १२ नग बंडल मिळुन आलेत वेस्टन असलेल्या बंडलची पंचासमक्ष खोलून पाहणी केली असता, त्यात हिरवा ओलसर पाने, फुले आणि बिया मिश्रीत एकूण वजनी १२ किलो १६० ग्रॅम, उग्र वास येत असलेला गांजा किंमती एकूण २ लाख ६९ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनात सदरची कारवाई व जप्तीची प्रक्रिया पार पडण्यात आली. आरोपी दिनेश मिश्रा, सोमेश्वार न्यायकरे याच्या विरुद्ध फिर्यादी पो. हवा. राजेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसात एन. डी. पी. एस. कायदा कलम ८ (क), २०, २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, पो.नि. प्रविण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात मपोउपनि वनिता सायकर, पो.हवा. राजू मिश्रा, महेश मेहर, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, भूतनलाल देशमुख, सुजित हलमारे, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, संतोष केदार, घनश्याम कुंभलवार, मपोशि कुमुद येरणे आदीनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button