गडचिरोलीविदर्भसामाजिक

सिरोंचा येथील मजुराला अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिला मदतीचा हात!

सिरोंचा : अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या सामाजिक कार्यासाठी, आपल्या दानशूर वृत्तीसाठी तसेच प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या संकटात सदैव तत्पर असे नेता म्हणून प्रसिद्ध आहेत.

जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथील प्रभाग क्र. ०६ येथील रहिवासी सत्यम भूमय्या दासरी हे मजुरी काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असतात. ते अनेक दिवसांपासून आजाराने त्रस्त आहेत. त्यांना तात्काळ सिरोंचा वरून नागपूर येथे उपचारासाठी नेणे गरजेचे होते. पण खाजगी गाडी किरायाने करून जाणे आर्थिक अडचणीमुळे शक्य नव्हते. ही माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना सांगितली. त्यावेळी राजे आत्राम यांनी तात्काळ मदतीचा हात देत रुग्णाला नागपूरला नेण्यासाठी गाडी करून दिली व पुन्हा सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दासरी कुटूंबातील सदस्य तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button