गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्राचार्य संजीव गोसावी, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, प्रा. डॉ. राकेश चडगुलवार, प्रा. गजानन ढोले, ज्येष्ठ शिक्षक घनश्याम वाळके, योगेश आसामवर, रुपेश बारसागडे, शहीद शेख, संतोष बोबाटे, सैनिकी निदेशक नामदेव प्रधान हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित  करण्यात आले.

प्रसंगी प्राचार्य गोसावी लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना म्हणाले कि, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असा नारा देऊन त्यावेळी तरुणांमध्ये टिळकांनी नवा उत्साह भरविला. एका अर्थाने तर बाळ गंगाधर टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात नवसंजीवनीच दिली. त्यांनी ब्रिटीश राजवटीला शाप मानले आणि ते उखडून टाकण्यासाठी कोणताही मार्ग चुकीचा मानला नाही, व ज्या त्या पद्धतीने ते चळवळीत सहभाग घेत होते व देशाला स्वातंत्र्य मिळवून देनासाठी झिजले, जनजागृतीसाठी व सर्वांमध्ये एकोप्याची भावना सतत राहो याचेकरीता त्यांनी महाराष्ट्रात आठवडाभर गणेश उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली, अश्या महान व्यक्तीचे कार्य अंगीकारणे हे महत्वाचे आहे असे मत व्यक्त केले.

टिळकांबद्दल बोलताना पर्यवेक्षक अजय वानखेडे म्हणाले कि, 1897 च्या कालावधी मध्ये महाराष्ट्रात प्लेग, दुष्काळ आणि भूकंप हे संकट एकत्र आले होते. परंतु दुष्ट इंग्रजांनी या परिस्थितीतही जबरदस्तीने भारतीयांकडून भाडे वसूल करणे सुरूच ठेवले होते. ते सर्व पाहून टिळक खवळले होते, त्यामुळे टिळकांचे मन उद्विग्न झाले होते व त्यांनी त्याविरोधात जनतेला संघटित करून त्यांनी आंदोलन सुरू केले होते. टिळकजी एक उत्तम पत्रकारही होते. त्यांनी इंग्रजीत ‘मराठा’ आणि मराठीत ‘केसरी’ ही साप्ताहिके काढली. त्यात प्रसिद्ध झालेल्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि नंतर देशभरात स्वातंत्र्य आणि स्वदेशीत्वाची ज्योत प्रज्वलित केली होती. उतारवयातही त्यांच्यात स्वातंत्र प्रेम भरभरून होतेच, ते स्वातंत्र्यासाठी लढत राहिले. शेवटी तुरुंगातील छळ आणि मधुमेहामुळे त्यांचे शरीर जर्जर झाले होते. मुंबईत त्यांना अचानक न्यूमोनियाचा ताप आला आणि त्यांनी 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईतच अखेरचा श्वास घेतला. त्यांचे महान कार्यच आताच्या युवकांचे प्रेरणास्थान बनायला पाहिजे असे बोलून भारतमातेचे सुपुत्र, महान क्रांतिकारक, शिक्षक, विचारवंत, देशभक्त, महान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केले.

यावेळी उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, प्रा. डॉ. राकेश चडगुलवार व घनश्याम वाळके यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक प्रशांत म्हशाखेत्री यांनी केले तर आभार प्रा. विजय गोंडाणे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button