गडचिरोलीविदर्भ

मूडझा येथील एकाही नुकसानग्रस्त व्यक्तीला मोबदल्यापासून वंचित ठेवू नका – आ. डॉ. देवराव होळी

नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी

गडचिरोली : सातत्याने होणाऱ्या अतिवृष्टीमुळे मूडझा तालुका गडचिरोली येथील तलावाची पाळ फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे व मासेमारी करणाऱ्या बांधवांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व मासेमारी करणाऱ्या बांधवांना शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्यापासून वंचित ठेवू नका सर्वांना सहकार्याच्या भावनेने शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुडझा गावाला भेट दिली असता संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना केली.

याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव इचोडकर, नवेगावचे उपसरपंच राजू खंगार, महिला नेत्या व शेतकरी प्रतिभा चौधरी यांचेसह स्थानीक नागरीक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button