गडचिरोलीविदर्भ

सुरगाव येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे छत्र्यांचे वितरण

प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांचा पुढाकार

मुलचेरा : तालुक्यांतर्गत येणाऱ्या वेंगनूर या उपकेंद्राला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर सुरगाव येथील नागरिकांना पावसाळ्यापासून संरक्षण करता यावे, याकरिता छत्रींचे करण्यात आले. यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांनी पुढाकार घेतला असून यावेळी राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेद्र बिस्वास, डॉ. भारत खटी, मुरखळाचे सरपंच भास्कर बुरे, गुड्ड खुणे, प्राथमिक उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

वेंगणूर आरोग्य उपकेंद्रात विविध समस्या असून त्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी खुणे यांनी दिली. वेंगणूर उपकेंद्राला शासनाने स्वतंत्र रूग्णवाहिका, वॉटर फिल्टर संरक्षण भींत उपलब्ध करून परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरातून शासनाला कोट्यावधी रूपयाचा महसूल प्राप्त होते. मात्र, त्याचा उपयोग या परिसराचा विकास करण्यासाठी खर्च करण्यात यावा, अशीही मागणी यावेळी उपस्थित मान्यवरांनी केली.

राष्ट्रीय मानवाधिकार संगठनच्यावतीने जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. मागील अनेक वर्षा पासून विविध सामाजिक, राजकीय, पत्रकार आदी क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्यांना गौरविण्याचे कामही या संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. यासोबतच गरजूंना वेळोवेळी वेगेवेगळ्या साहित्याचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कामही संघटनेच्यावतीने करण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button