गडचिरोलीविदर्भ

अहेरीत नेत्र तपासणी शिबीर ; ६०० नागरिकांची तपासणी

माजी सदस्य हर्षवर्धनबाचा आत्राम तसेच डॉ. मिताली आत्राम यांचा पुढाकार

अहेरी : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात व अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाचा आत्राम तसेच डॉ. मिताली आत्राम यांच्या पुढाकारातून पहिल्यांदाच अहेरी येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवार, ४ ऑगस्टला इंडियन फंक्शन हॉल येथे घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरात जवळपास ६०० पेक्षा अधिक जणांनी नेत्र तपासणी केली.

अहेरी विधानसभा क्षेत्र हा अतिदुर्गम भाग असल्याने येथील विविध आजारांच्या रुग्णांना जिल्हा मुख्यालय किंवा चंद्रपूर, नागपूर सारख्या शहरात जाऊन उपचार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात ‘मावा स्वास्थ्य मावा अधिकार’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत खेड्यापाड्यातील रुग्णांची शोध घेऊन योग्य उपचार व औषधोपचार केले जात आहे. दरम्यान, अनेक वयोवृद्ध आणि इतर नागरिकांमध्ये नेत्रदोष मोतीबिंदू सारखे आजार दिसून येत आहे. या रुग्णांना एकाच दिवशी व एकाच ठिकाणी योग्य उपचार व सल्ला मिळावा या उदात्त हेतूने पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम तसेच त्यांची अर्धांगिनी डॉ. मिताली आत्राम यांनी रविवार, ४ ऑगस्टला अहेरी येथील इंडियन फंक्शन हॉल येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

विशेष म्हणजे या शिबिरात डॉ. ध्रुबोज्योती साहा, डॉ. नेहा अग्रवाल तज्ञ डॉक्टरांनी व त्यांच्या चमूने नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी व मोफत उपचार केले. तसेच शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील तारीख देऊन त्यांना प्राचारण करण्यात आले. अहेरी उपविभागातील एटापल्ली, अहेरी, मुलचेरा तालुक्यातील शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात आलेल्या रुग्णांची वॉलेंटियरकडून योग्य काळजी घेण्यात आली तसेच त्यांच्यासाठी जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. या शिबिरासाठी हर्षवर्धनवाबा आत्राम यांच्या चमूने विशेष परिश्रम घेतले.

अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचे सुपुत्र पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच सून डॉ. मिताली आत्राम यांनी अहेरी उपविभाग ‘मावा स्वास्थ मावा अधिकार’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमांतर्गत खेड्यापाड्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा दिले जात आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धनवाबा आत्राम यांची अर्धांगिनी डॉ. मिताली आत्राम या वैद्यकीय क्षेत्रातून असल्यामुळे त्यांनी स्वतःला या क्षेत्रात झोकून घेतल्याने दुर्गम भागातील नागरिकांना मोठा फायदा होत आहे. त्यांच्याकडे दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोठी चमू देखील उपलब्ध आहे. सतत खेड्यापाड्यात शिबिर घेऊन आरोग्य तपासणी व औषधोपचार केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button