गडचिरोलीविदर्भ

आदर्श पदवी महाविद्यालयात नवागत प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत व संवाद समारोह संपन्न

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील आदर्श पदवी महाविद्यालयात शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये विविध अभ्यासक्रमात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा कारु, प्रा. प्रशांत ठाकरे, प्रा. संजय डाफ, प्रा. मेश्राम, महाविद्यालयाचे समन्वयक भरत घेर तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

नवागत प्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. कारु यांनी महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयात सुरु असलेले विविध अभ्यासक्रम, सदर अभ्यासक्रमाबाबत माहिती, त्यांचे महत्व आणि भविष्यात होणारे फायदे आणि उपयोग याबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांच्या वाढीसाठी महाविद्यालय कसे प्रयत्नशील आहे याचे दाखले दिले.

प्रास्ताविक महाविद्यालयाचे समन्वयक भरत घेर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रिती भांडेकर, प्रा. रेणुका गव्हारे यांनी तर आभार प्रा. सुदर्शन जानकी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सह समन्वयक यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button