
गोंदिया : जिल्हा नियोजन समितीची सभा अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे अध्यक्षतेखाली बुधवार, 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे आयोजित केली आहे.
सभेची विषय सुची खालील प्रमाणे आहे. जिल्हा नियोजन समिती सभा 23 डिसेंबर 2023 च्या इतिवृत्तास मंजूरी देणे. जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत माहे मार्च 2024 अखेर झालेल्या खर्चास मान्यता प्रदान करणे (सर्वसाधारण योजना, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्र). जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत राबविण्यात येणा-या योजनांचा माहे जुलै 2024 अखेर पर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे (सर्वसाधारण योजना, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्र), जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 च्या अनुषंगाने कामांना मंजुरी प्रदान करणे व अध्यक्ष महोदयांचे परवानगीने वेळेवर येणारे इतर विषय. या सभेस सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी अद्ययावत माहितीसह नियोजित वेळेपूर्वी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.



