गडचिरोलीविदर्भ

मतदार यादी दुरुस्तीसाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदत

मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर

गडचिरोली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 06 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादीची प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीत आपले नाव असल्याबाबत  मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) तसेच तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयात भेट देऊन किंवा व्होटर हेल्पलाइन ॲप यावरून खात्री करावी. मतदार यादीत दुरुस्ती, वगळणी, मतदार ओळखपत्राबाबत विनंती अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करावेत. यासाठी फॉर्म नंबर 6, 7 किंवा 8 चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

०६ ऑगस्ट पासून २० ऑगस्ट २०२४ पर्यंत या कालावधीत मतदार नोंदणी करण्यासह, मतदार यादीतील नाव, पत्ता, आणि अन्य तपशील पडताळून, त्यात बदल सुधारणा करण्याची संधी नागरिकांना असणार आहे.

10 ऑगस्ट, 11 ऑगस्ट, 17 ऑगस्ट, 18 ऑगस्ट या काळात युवा नवमतदार, दिव्यांग, महिला, तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जाती-जमातीच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील. कार्यक्रमाच्या कालावधीतील शनिवार आणि रविवार या दिवशी या शिबिरांचे आयोजन केले जाईल. या शिबिरांच्या माध्यमातून लक्षित घटकांना मतदार नोंदणीची संधी सुलभरित्या उपलब्ध करून दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button