नांदेडमहाराष्ट्रमुंबई

लोकसभेत मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाला शंभर टक्के यश मिळाले, विधानसभेत देखील असेच यश मिळणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

काँग्रेस कोणी संपवू शकत नाही ; डर गया सो...भाग गया...

नांदेड : काँग्रेस पक्ष नेत्यांचा नसून कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे नांदेडची जागा काँग्रेसला मिळाली. नेते येतील आणि जातील पण नांदेडमध्ये काँग्रेस कोणी संपवू शकत नाही. काँग्रेसची मूळं नांदेड जिल्ह्यात खोलवर रुजली आहेत, ‘डर गया सो…भाग गया’ पण लक्षात ठेवा आम्ही घाबरणारे नाही. अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची तोफ नांदेड येथे धडाडली.

वडेट्टीवार म्हणाले की, मराठवाडा येथे काँग्रेसने तीन जागा लढवल्या आणि तिन्ही जागा जिंकल्या मराठवाड्याने १०० टक्के निकाल दिला. त्यामुळे तुम्ही निर्धार करा आणि हात उंचावून सांगा विधान सभेवर काँग्रेसचा झेंडा फडकवला शिवाय आम्ही थांबणार नाही, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा खासदार वसंतराव चव्हाण यांच्या नावाने त्याची सुरुवात होईल. काँग्रेस नेते अमित देशमुख यांची तोफ देखील आता धडाडत आहे. आधी त्यांच्याकडे दारूगोळा होता पण पेटवता येत नव्हता. आता मात्र ताकद मिळाली आहे. ‘वो लाख कह दे की आकाश हू मैं, जमीन हू मैं, मगर उन्हे पता है काँग्रेस के बगैर वो कुछ नही’ या शेरच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्यांना त्यांनी टोला लगावला. काँग्रेस पक्षाला विधानसभेत मराठवाड्यातून १०० टक्के यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वडेट्टीवार म्हणाले, सोयाबीन उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला आहे. कापसाला दर मिळत नाही. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. तरीही महाराष्ट्राच्या गादीवर बसलेल्यांना लाज वाटत नाही. महाराष्ट्राची अस्मिता गुजरातकडे गहाण ठेवली आहे. महायुतीच्या कारभारामुळे राज्य उध्वस्त झाले आहे. काँग्रेस म्हणजे नैसर्गिक पक्ष भाजप मात्र कृत्रिम आहे. चोर, डाकू, लुटेरे सगळे आता भाजप मध्ये गेले आहेत. कोणी सीबीआय, इडी मुळे घाबरून गेले. तिथे आता चोरांचा बाजार झाला असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button