
महाविकास आघाडीचा खोटारडेपणा जनतेला पटवून दिल्यास विजय आपलाच – किसन नागदेवे
कोरची (ता.प्र.) : केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेचा जीवनमान उंचावण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असून त्या योजनांची गावागावात चर्चा करून जनतेला प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जन सेवा हीच ईश्वर सेवा समजूत कार्य करुन महाविकास आघाडी सरकारचा खोटारडेपणा जनतेला सांगा, असे आवाहन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
कोरची येथील स्व. मोरेश्वर फाये महाविद्यालय, खुणारा येथे 12 ऑगस्टला आयोजित तालुका कार्यकारणीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. बैठकीत लोकसभा निवडणूक प्रमुख किसन नागदेवे, भारत बावनथडे, देवराव गजभिये, उपसरपंच रुपराज देवांगन, माजी पंस सदस्य आसाराम शेंडे, सदाराम नुरूटी, यशवंत वाळदे, हिवराज कराडे, बापुजी उईके, कौसल्या काटेंगे, गिरजा कोरेटी, नगरसेवक मेघश्याम जमकातन, नगरसेवीका प्रतिभा मडावी, नगरसेवीका दुर्गा मडावी, मालता हिडामी, मधुकर नखाते, आनंद चौबे, नसरूद्दी भामानी, गुड्डूभाऊ अग्रवाल, नैतराम कौशिक, नंदु पंजवानी, भगतराम जेटूमल, स्वप्नील कराडे, प्रशांत कराडे, डॉ. दादगाये, भाजपा तालुका महिला आघाडी अध्यक्षा शिला सोनकुत्तरे, निकल मोहुर्ले, धनायबाई मडावी, शांंतीबाई मडावी, श्रावजी बोगा, तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या भाजपा बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व विविध आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लोकसभा प्रमुख किसन नागदेवे यांनी मोलाचे मार्गदर्शन करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी लोकसभेचा पराभव विसरून विरोधकांच्या खोट्या अपप्रचाराला बळी न पडता विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याकडून होणारा दुषप्रचाराचा वेळीच खंडन करून सत्य काय ते जनतेपुढे आणण्याचे आवाहन केले. यावेळी संघटन सक्तीचे विशेष महत्त्व लोकसभा निवडणूक प्रमुख किशन नागदेवे यांनी कार्यकर्त्यांना पटवून दिले.

तालुका कार्यकारणी बैठकीला पाचशेच्या वर भाजपा पदाधिकारी, बुथप्रमुख, शक्ति केंद्रप्रमुख, विविध आघाडीचे पदाधिकारी व तालुका विविध आघाडीचे पदाधिकारी व बुथ समिती वरिल सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी असंख्य वरिष्ठ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे धोरणाला तसेच खोट्या आश्वासनाला कंटाळून आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
यामध्ये विनोद कोरेटी, रूपराम देवांगन, बसंत भक्ता, पवन कोराम, परदेशी कोडापे, तुलशीराम मड़वी, काशीराम मडावी, नंदु सिन्हा, प्रताप सुवा, खोरबाहरा नायक, नरेश खोबा, दिलेश्वर शहाळा, घुरू शहाळा, दीरबल शहाळा, नीलकमल करसाल, बिहारी शहाळा, राजु सहारे, खिलेश बागडेरिया, हेमलाल शहाळा, नितेश शहाळा, हेमकृष्ण सुवा, देवेंद्र दूधनांग, मालिकचंद भक्ता, जगनशिंग जमकातन, रतन सहाळा, देवा सांगसुरवार, नंदकुमार जुळा, दिनेश सोनार, भूषण बागडेरिया, अंकित नदेश्वर, अमजद पठाण, खुशाल कोराम, हितेश खोबा, श्यामचरण मानकर, हेमराज जमकातन, प्रमोद तुमरैती, यशकुमार ढेक, मालेश खोबा, मिटलेश खोबा यांचा समावेश आहे. बैठकीचे प्रास्ताविक आनंद चौबे यांनी केले. संचालन देवराव गजभिये यांनी तर आभार नसरूद्दी भामानी यांनी मानले.



