गडचिरोलीविदर्भ

डॉक्टरांनी रुग्णांची, समाजाची सेवा करावी ; विधानसभेसाठी उभे राहु नये – सामाजिक कार्यकर्ते रुपेश वलके

गडचिरोली : विधानसभा क्षेत्रातील राजकारणात डझनभर डॉक्टर उभे राहण्यास ईच्छुक आहेत. डॉक्टरांनी राजकारणाच्या भानगडीत न पडता त्यांनी रुग्णाची सेवा करावी, गोरगरीब रंजल्या गाजल्याची सेवा करावी, समाजाची सेवा करावी कारण डॉक्टर आरक्षणाचा फायदा घेऊन डॉक्टर झालेले आहेत. राजकारणात उभे राहणाऱ्या डॉक्टरावर निर्बंध यायला पाहिजे. डॉक्टर राजकारणात उभे राहात असल्यास त्यांनी आपली पदवी हटवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रुपेश वलके इंदिरा गांधी चौकातील स्थानिक रेस्ट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

डॉक्टर जर राजकारणात आले नाही तर आरोग्य मंत्री कोण बनेल, शिक्षक जर राजकारणात आले नाही तर शिक्षण मंत्री कोण बनेल? असा प्रतिप्रश्न पत्रकारांनी विचारला असता. माझे वैयक्तीक मत आहे असे वालके म्हणाले. येत्या गडचिरोली विधानसभेच्या निवडणुकीत आपणही ताकतीनिशी उभे राहण्याचा सुतोवच रुपेश वलके यांनी पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषदेला सामाजीक कार्यकर्ते रुपेश वलके, जमील शेख, नरेश बुरे, भारत बुरांडे, तेजश रहाटे, लियाकत शय्यद, अक्षय मेश्राम आदींची उपस्थिती होती.

डॉक्टरांना आरक्षण मिळून सुद्धा राजकारणात

डॉक्टर हे मानवरूपी देव असतात. 5 ते 6 वर्ष शिक्षण घेतात, स्ट्रगल करतात आणि डॉक्टर होतात. डॉक्टर होण्याची शपथविधी घेतात. हे आणि त्याच्या नंतर मग महत्वाचा मुद्दा आहे, कि डॉक्टर हे सेवा न देता डॉक्टर हे राजकारणाकडे वळतात. हे मात्र अत्यंत दुःखदायक आहे. यापुढे डॉक्टरांनी अगर अभ्यास करून राजकारणात यायचंच जर ठरवल असेल तर एखाद्या गोर-गरीब आदिवासी मुला-मुलींच भविष्य धोक्यात घालू नका ही विनंती करतो.

– सामाजिक कार्यकर्ते रूपेश वलके

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button