क्राईमगडचिरोलीविदर्भ

चारचाकी वाहन व अवैध दारुसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त

जिमलगट्टा पोलिसांची धडक कारवाई

गडचिरोली : जिमलगट्टा ते देचलीपेठा रस्त्याने अवैध दारुची वाहतुक होणार असल्याच्या गोपनिय माहितीवरुन सापळा रचून जिमलगट्टा पोलिसांनी चारचाकी वाहन व अवैध दारूसह तब्बल २० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 13 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत दसूरकर, प्रभारी अधिकारी संगमेश्वर बिरादार यांनी केली.

जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जात आहे. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणाऱ्यावर अंकुश लावण्याबाबत या आधीच निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने 13 ऑगस्ट रोजी एक इसम बोलेरो पिकअपने देचलीपेठा कडे अवैध दारू वाहतूक करणार असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलिस पथकासह सदर ठिकाणी रवाना झाले. सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे जिमलगट्टा पासून 02 किमी पुर्वेस जिमलगट्टा ते देचलीपेठा रोडलगत नाल्याजवळ जंगलात सापळा रचुन बसले असता, सकाळी 08:00 वा. चे दरम्यान जिमलगट्टा कडुन देचलीपेठाकडे एक संशयीत चारचाकी बोलेरो पिकअप वाहन हे भरधाव वेगाने येतांना दिसले. त्यावेळी पोलीसांनी वाहन चालकाला थांबवून त्याचे नाव विचारले असता, त्याने आपले नाव आदेश सत्यप्रकाश यादव रा. जिमलगट्टा असे सांगितले. सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात 90 एम.एल रॉकेट देशी दारुचे 210 कागदी कार्टन बॉक्स मिळून आले असून, प्रति कार्टन बॉक्समध्ये 100 नग प्रमाणे एकुण 21,000 नग रॉकेट देशी दारुच्या बॉटल (विक्री किंमत प्रती नग 80/- रु. प्रमाणे) एकुण 16,80,000/- रुपयांचा दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन, वाहन क्र. एम एच 26 बी.ई 4504 अंदाजे किंमत 3,50,000/- रुपये असा एकुण 20,30,000/- (अक्षरी वीस लाख तीस हजार रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला.

संबंधीत घटनेच्या अनुषंगाने उपपोस्टे जिमलगट्टा येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम 65 (अ), 81 महा. दा. का. अन्वये आरोपी आदेश सत्यप्रकाश यादव (वय 36) रा. जिमलगट्टा, तह. अहेरी याचेविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा शशिकांत दसूरकर यांच्या नेतृत्वात प्रभारी अधिकारी जिमलगट्टा सपोनि. संगमेश्वर बिरादार, परिपोउपनि. आनंद गिरे, नापोअं केडमवार, नापोअं साखरे, पोअं गणविर व पोअं सुंकरी यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button