
गडचिरोली : आपल्या प्रयत्नातून रेगडी जलाशयाच्या सिंचनासाठी ५ कोटी रुपयांची कामे नुकतीच झाली असून मुख्य कालव्याच्या दुरुस्तीसाठी ५० कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर करून आणला असून लवकरच कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे रेगडी परिसरातील एकाही शेतकऱ्याला आपण सिंचनापासून वंचित राहू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी रेगडी जलाशयाच्या जलपूजन प्रसंगी केले.
यावेळी कार्यकारी अभियंता राहुल मोरघळे, शाखा अभियंता विकास दूधबावरे, जैराम चलाख, युमो महामंत्री यश गण्यारपवार, भोजराज भगत, दिपक वासेकर, प्रतीक राठी, रामचंद्र वरवाडे, यांचेसह स्थानीक शेतकरी बांधव उपस्थित होते.



