गडचिरोलीविदर्भ

स्वातंत्र्य दिनानिमित्त एस.बी. महाविद्यालयात वृक्षारोपण

अहेरी : स्थानिक श्री. शंकरराव बेझलवार कला व वाणिज्य महाविद्यालय, अहेरी येथे 15 ऑगस्ट रोजी प्राचार्य डॉ. विजय सोमकुवर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर एन.एस.एस, एन.सी.सी. व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने शासनाच्या परिपत्रकानुसार ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सोमकुवर हे होते तर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा रोजा करपेत उपस्थित होत्या.

अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. विजय सोमकुवर यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत ‘ग्लोबल वार्मिंग’ दिवसेंदिवस वाढत असल्याने वृक्षारोपण करून धरती मातेचे अंशतः का होईना ऋण फेडावेत असे आवाहन केले. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी व नगराध्यक्षा  रोजा करपेत यांनी त्यांच्या यशामध्ये डॉ. आंबेडकरांनी निर्माण केलेली संधी, महाविद्यालयाचा वाटा व गुरुवर्यांची शिकवण यांचे आभार मानत विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

नगराध्यक्षा रोजा करपेत यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य, समस्त प्राध्यापक वृंद तसेच विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले आणि त्यांचे संवर्धन करण्याची शपथ घेण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस अधिकारी प्रा. प्रभाकर घोडेस्वार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख प्रा. चंद्रशेखर गौरकार यांनी केले व आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख प्रा. गजानन जंगमवार यांनी केले यावेळेस मंचावर इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. रवींद्र हजारे उपस्थित होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. उत्तरवार, प्रा. बनसोड, प्रा. पेंदाम, प्रा. शंभरकर, प्रा. तेलंग, डॉ. घनमोडे, प्रा. जवादे, डॉ. वाघ, प्रा. शेख, प्रा. काटकर, प्रा. सहारे, प्रा. लांडे, प्रा. आवारी, प्रा. मेश्राम तसेच शिक्षकेतर कर्मचारी कष्टी, शिंपी, जाकेवार, पेंदोर, वाघाडे व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button