यवतमाळविदर्भ

नाल्यात आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह 

रविवारी दुपारपासून होती बेपत्ता ; घातपाताचा संशय

पांढरकवडा : तालुक्यातील करणवाडी येथील एका १५ वर्षीय मुलीचा गावाजवळ असलेल्या नाल्यात मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

करणवाडी येथील कोमल विलास वडस्कर ही मुलगी रविवारी दुपारी ४ वाजतापासून घरी नव्हती. ती घरातून बेपत्ता झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि तिचा युद्धस्तरावर शोध घेण्यात आला. परंतु सोमवारी सकाळी गावालगत असलेल्या नाल्यावर एक व्यक्ती मासे पकडण्यासाठी गेला असता, त्याला पाण्यात एका मुलीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या व्यक्तीने गावात जाऊन ही माहिती दिली. नाल्यात आढळून आलेला मृतदेह हा कोमलचा असल्याची खात्री पटली. पोलिस पाटील नीलेश पुनेकर यांनी तातडीने या घटनेची पोलिस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळावर पोहोचले. मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. अद्याप मृत्यूचे कारण समजले नाही. पोलिस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरकवडा पोलिस अधिक तपास करीत आहे. शवचिकित्सा अहवालानंतर या घटनेचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. त्यानंतरच तपासाची दिशा ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button