गडचिरोलीविदर्भ

जिल्हाधिकारी संजय दैने यांनी मार्कंडेश्वर मंदिरातील कामाची केली पाहणी

जीर्णोद्धार कामासाठी नक्षीकाम केलेल्या दगडांचाच वापर करण्याच्या सूचना

चामोर्शी : जिल्हाधिकारी संजय दैने यांनी २१ ऑगस्टला विदर्भाची काशी म्हणून ख्याती असलेल्या मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरातील कामाची पाहणी करून पूजाअर्चना केली. तसेच मंदिराच्या जीर्णोध्दार कामासाठी नक्षीकाम केलेल्या दगडांचाच वापर करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली.

यादवकालीन मार्कंडेश्वर मंदिर शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिरासाठी वापरलेल्या दगडांवर आखीव रेखीव नक्षीकाम केलेले आहे. सध्या जीर्णोध्दाराचे काम सुरू आहे. याकरिता नक्षीकाम असलेले दगडच वापरावेत, त्यांची मांडणी पूर्वीप्रमाणेच असावी, कार्यारंभ आदेशानुसारच काम करावे, असे निर्देश त्यांनी कारागिरांना दिले. या कामावर देखरेखीसाठी ठेकेदार हजर नव्हता, त्यामुळे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी नाराजी व्यक्त केली. येत्या सोमवारी भारतीय पुरातत्व विभागाच्या ठेकेदार, कारागीर, संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी तहसीलदार प्रशांत घोरुडे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी हर्ष सिंग, छबिलदास सुरपाम, देवस्थान ट्रस्टचे सचिव मृत्युंजय गायकवाड, रामू महाराज गायकवाड, श्रीकांत महाराज पांडे, मनोज हेजीब, माणिक कोडापे, पुरुषोत्तम शेंडे उपस्थित होते. मंदिर समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button