गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

वनविभागातील वनमजुर, वनरक्षक व वनपाल यांच्या विविध समस्यांवर चर्चा

समस्यांचे निवारण करण्याचे वनसंरक्षकांनी दिले आश्वासन

गडचिरोली : गडचिरोली वनवृत्तातील वनमजुर, वनरक्षक व वनपाल यांच्या समस्या सोडविण्याकरीता 23 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अजय पाटील यांचे नेतृत्वात वनसंरक्षक, गडचिरोली यांचे दालनात सभा आयोजित केली होती. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या तक्रारीबाबत बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करून सर्व समस्यांचे तात्काळ निवारण करण्याचे आश्वासन वनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी संघटनेला दिले.

बैठकीत वनविभागातील कर्मचाऱ्यांना विशेष कृती कार्यक्रम अंतर्गत एकस्तर पदोन्नतीचा लाभ व 15 टक्के प्रोत्साहन भत्ता 7 व्या वेतन आयोगानुसार देण्यात यावा, बक्षी समितीचा खंड 2 लागू करण्यात यावा, महाराष्ट्र नागरी सेवा जेष्ठतेचे विनियमन नियमावली 2021 लागू करण्यात यावी, विभागीय चौकशी व निलंबन प्रकरणे निकाली काढण्यात यावे, कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके अद्यावत करण्यात यावे, नियतक्षेत्रांचे पुर्नगठन करण्यात यावे, वनरक्षक व वनपाल यांना मदतनिस देण्यात यावे, सिरोंचा वनविभागातील कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले मंजुर करण्यात यावे, संगणक चालक यांना पि.सी.सी.एफ कार्यालयातील ऑपरेटर प्रमाणे वेतन देण्यात यावे, वनविभागातील वनवसाहत येथील इमारतीचे दुरूस्ती करण्याबाबत, वन्यप्राणी व वन्यजीव व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करणेबाबत, वनमजूरांची सेवाजेष्ठता प्रकाशित करणेबाबत इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सदर सभेला सिध्दार्थ मेश्राम, पुनम बध्दावार, भारत साबळे, सुनिल पेंदोरकर, किशोर सोनटक्के, सुबिनय सरकार, ईश्वर मांडवकर, अनंत ठाकरे, रूपेश मेश्राम, रवि जुवारे, नितेश तुमपल्लीवार, विकास शिवणकर व संघटनेचे पदाधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button