क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

दारू विक्रेत्याच्या घरातून २१ लाखांची रोकड जप्त

पोलिसांचा दारू विक्रेत्याच्या घरावर छापा ; आरोपी फरार 

गडचिरोली : पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव येथील स्वप्नील उर्फ शुभम शेंडे या दारू विक्रेत्याच्या घराल दारू लपवून ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांना त्याच्या घरावर छापा टाकला असता, हजारो रुपयांची देशी दारू तसेच सुमारे २१ लाख ८० हजार २४० रुपयांची रोकड आढळून आली. त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिस संपूर्ण रक्कम व दारु असा एकूण २१ लाखख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केली. मात्र दारू विक्रेता स्वप्नील शेंडे हा फरार झाला.

सदर कारवाई ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दीपक चव्हाण, महिला पोलिस उपनिरीक्षक आरती सासवडे, पोलिस हवालदार पोल्लेलवार, स्वप्नील कुडावले, महिला पोलिस कर्मचारी वाचामी, बडे, मेश्राम, भुसारी आदींनी केली. स्वप्नील शेंडे याच्या घरावर केलेल्या कारवाईदरम्यान स्वप्नील घराबाहेर होता. घरातून २१ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळताच स्वप्नील फरार झाला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दारूविक्रेत्याच्या घरातून एवढी मोठी रक्कम जप्त केल्याची ही पहिलीच कारवाई आहे.

स्वप्नील शेंडे याच्या घरात दारूसाठा असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक त्याच्या घरी पोहोचले. मात्र घराच्या दरवाजाला कुलूप होते. दरम्यान, घरासमोर बसलेल्या यशोदा शेंडे नामक महिलेची चौकशी केली असता तिने घर आपल्या मालकीचे असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी पंचांसमक्ष दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तपासादरम्यान पोलिसांना २१ लाख ८० हजार २४० रुपयांची रोख रक्कम सापडली. या रकमेत ५००, २००, १००, ५० आणि २० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. दारू विक्रेत्याच्या घरात एवढी मोठी रक्कम आली कुठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button