गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

जिल्ह्यातील ७७ गावात होणार ‘एक गाव एक गणपती’ची प्रतिष्ठापना

४६९ सार्वजनिक मंडळांनी केली नोंदणी

गडचिरोली : अख्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणपती बाप्पाचे 7 सप्टेंबर रोजी जल्लोषात आगमन होणार आहे. गणेशोत्सवामुळे सगळीकडे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोली जिल्हयात सुध्दा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. जिल्हयातील 77 गावांमध्ये एक गाव एक गणपती’ ची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्याचबरोबर 469 सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने बाप्पाची प्रतिष्ठापना होणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने चोख व्यवस्था बजावली आहे. गणेशोत्सवादरम्यान बंदोबस्तासाठी 150 पोलीस अधिकारी, 2 हजार पोलीस कर्मचारी आणि 650 होमगार्ड तैनात करण्यात येणार आहे. गणेशोत्सव मिरवणूकावरती ड्रोन द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button