गडचिरोलीविदर्भ

देवापुर येथील सुरजचे आयपीएल क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रणय खुणे यांनी घेतला पुढाकार

गडचिरोली : तालुक्यातील पोटेगाव प्रभागातील जंगलव्याप्त अतिसंवेदनशील चोहीकडे फक्त वन व्याप्त असा ग्रामपंचायत देवापुर हे गाव. या गावातीलच मजबूत शरीरयष्टी असलेला सुंदर दिसणारा नवयुवक ज्याचे पूर्ण नाव सुरज सुधाकर पोटावी सकाळी उठल्याबरोबर घरच्या लोकांसोबत शेतीवाडीवर व जंगल बिहडात काम करायसाठी जायच त्यातच या नवयुकाला क्रिकेट खेळण्याचे व्यसन जडले आणि या व्यसन पूर्ण करण्यासाठी गावाच्या आजूबाजूला होणारे छोटे मोठे क्रिकेट स्पर्धेत भाग घ्यायचा. या स्पर्धेत भाग घेताना त्याने आजपर्यंत अनेक पुरस्कार जिंकले आणि या पुरस्कारातून त्याला खूप प्रोत्साहन मिळाले आणि या प्रोत्सानाच्या माध्यमातून त्याच्या जीवनामध्ये तो क्रिकेट स्टार होण्याची स्वप्न रंगवू लागला.

परंतु घरी अतिशय गरिबीची परिस्थिती हातावर आणून पानावर खाण्याची अवस्था असल्याने त्याचे स्वप्न अंधारात लोटले होते. या परिस्थितीत सुरज ने जिद्द सोडली नाही आणि आपले स्वप्न त्यांनी जिल्ह्यातील मोठमोठे नेते मंडळी यांच्याजवळ सुद्धा बोलून दाखवले. परंतु काही उपयोग झाला नाही. कारण देवापूर सारख्या खेड्यात राहणारा सुरज सारखा साधा युवक जेव्हा असा बोलतो आणि आयपीएल खेळण्याबद्दल इतरांसोबत चर्चा करतो. तेव्हा ते नक्कीच हास्यास्पद वाटते. परंतु ग्रामपंचायत देवापूर येथे (ग्रामसचिव) ग्रामसेवक असताना या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे येथील नागरिकांसोबत आजही जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे वेळप्रसंगी केव्हाही धावून येणारे मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांच्यासोबत सूरजने आपले स्वप्न शेअर केले आणि प्रणय भाऊंनी सुद्धा कुठलाही विचार न करता मेहनती असणारा सुरजचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला व त्याला नागपूर येथील क्रिकेट अकादमी मध्ये स्वखर्चाने महागडे फी भरून चांगले प्रशिक्षण देणे सुरू केले आणि सुरज आतापर्यंत विदर्भ असोसिएशन कडून क्रिकेट खेळलेला आहे. तसेच त्याचे नियमित सराव नागपूर येथे सुरू आहे आणि त्याचे प्रशिक्षण एमसीए नागपूर येथे सुरू आहे. सुरज स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व जीवनात क्रिकेट खेळाच्या माध्यमातून आयपीएल पर्यंत जाण्याची व राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी पर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करीत आहे. सुरजची आता छत्तीसगड क्रिकेट असोशियनकडून रणजी क्रिकेट खेळण्यासाठी वाटचाल सुरू आहे.

नुकताच तो मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय पुणे यांचे गोविंदपूर येथील डांबर प्लांट येथे सदिच्छा भेट घेण्यासाठी आला. यावेळी त्याच्या डोळ्यावर एक चमक दिसत होती आणि बोलताना उंच भरारी घेण्याची जिद्द सुद्धा दिसत होती. प्रणय भाऊ सारखे सर्वसामान्य गोरगरिबांच्या पाठीशी उभे राहणारे व आदिवासी समाजातील युवकांना पुढे जाण्यासाठी मदत करणारे या जिल्ह्यात फारच कमी आहेत, असे तो म्हणाला. पुढे तो म्हणाला, माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला विकायला सुद्धा निघालो होतो. परंतु ती वेळ आली नाही आणि भाऊ सन 2014 पासून अविरत मला मदत करत आहे. मी स्वतः दररोज क्रिकेटचा सराव करून अहोरात्र कष्ट करीत आहे, की येणाऱ्या दिवसांमध्ये मला आयपीएल खेळायला मिळेल यासाठी सुरज प्रयत्न करीत आहे. यावेळी बोलताना सुरजचे डोळे पाणवले आणि मनात प्रणय खुणे यांच्या विषयी पुन्हा मानसन्मान निर्माण झाले. कारण गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागातील काही युवक त्यांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा भाऊ स्वतःच्या कंपनीतून करीत आहेत. परंतु हे सर्व मदतीचे कार्य करताना  आपल्या कार्याचा कधीही प्रणय खुणे यांनी गाजावाजा केला नाही.

यावेळी बोलताना सुरज पोटावी याचे डोळे पानावले व तो म्हणाला माझ्यासारख्या युवकांना भाऊंनी मदत केली. ती मदत म्हणजे एखाद्या गरजूसाठी देव धावत येणे होती आणि भाऊंची मदत मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी विसरणार नाही आणि भाऊंची मदत वाया जाऊ देणार नाही आयुष्यात गरज असेल तेव्हा मी भाऊच्या एका आवाजात मी भाऊ जवळ उभा होईल.

सुरज सारख्या गोरगरीब युवकांनी क्रिकेटचे महागडे प्रशिक्षण घेऊन पुढे जाणे काही सोपे नव्हते. परंतु प्रणय खुणे सारख्या दानदात्यामुळे व त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज ते शक्य होताना दिसत आहे. सुरज सारख्या अनेक युवकांचे स्वप्न अंधारात आहेत, परंतु सध्या तरी सुरजचे स्वप्न येणाऱ्या दिवसात प्रकाशाकडे वाटचाल करो, यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना असो दिल्ली व संपूर्ण जिल्हा मानवाधिकार परिवाराकडून सुरजला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button