ग्रामपंचायत बोदली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे समान किमान कार्यक्रमानुसार माहे सप्टेंबर २०२४ मध्ये “बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई योजना व लोकोपयोगी सेवा व केंद्र/राज्य सरकारच्या विविध योजना” या विषयावर कार्यक्रम घेणेबाबत निर्देश दिलेले होते. त्याअनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली तर्फे १० सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता ग्राम पंचायत कार्यालय, बोदली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.
कायदेविषयक जनजागृती शिबीरास लोक अभिरक्षक कार्यालयाचे प्रमुख अॅड. एस. एस. भट, सहाय्यक लोक अभिरक्षक अॅड. स्नेहा ए. मेश्राम, सरपंच आकाश निकोडे, सचिव कु. नैताम उपस्थित होते.
लोक अभिरक्षक कार्यालयाचे प्रमुख अॅड. एस. एस. भट यांनी उपस्थितांना लोकोपयोगी सेवा व केंद्र/राज्य सरकारच्या विविध योजना तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे कार्य या बाबत सखोल माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक अॅड. स्नेहा ए. मेश्राम यांनी उपस्थितांना बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई योजना याबाबत माहिती दिली.
कायदेविषयक शिक्षण शिबिराचे संचालन कु. नैताम यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी वरिष्ठ लिपीक एन. आर. भलमे, कनिष्ठ लिपीक जे. एम. भोयर आणि शिपाई एस. एस. नंदावार यांनी अथक परिश्रम घेतले.



