गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

सोमनानी मित्र परिवाराने चालविलेले गणेशोत्सवातील उपक्रम कौतुकास्पद – माजी आ. हरिराम वरखडे

गणशोत्सवानिमित्त वैरागड येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन

आरमोरी : गणेश उत्सव हा आरती, पूजाअर्चा यापुरता मर्यादित न ठेवता दरवर्षी भोलूभाऊ सोमनानी मित्र परिवाराच्या वतीने गणेश उत्सवात विविध उपक्रम राबविले जातात. कबड्डी स्पर्धा, भजन स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार अशा विविध उपक्रमातूने सोमनानी मित्र परिवाराने गडचिरोली जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे हे उपक्रम कौतुकास्पद आहेत, अशा शब्दात माजी आमदार हरिराम वरखडे यांनी आपली भावना व्यक्त केली.

गणेशोत्सवानिमित्त वैरागड येथे गणशोत्सवानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून सरपंच संगीता पेंदाम, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य केशवराव गेडाम, उपसरपंच भास्कर बोडणे, सुकाळ्याचे सरपंच अविनाश कन्नाके, कोजबीच्या माजी सरपंच वैशाली डोंगरवार, दत्तू सोमनकर, माजी उपसभापती विनोद बावनकर, ग्राम पंचायत सदस्य आदेश आकरे, सत्यदास आत्राम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव दुमाने, मुखरु खोब्रागडे, नलिनी सहारे, नलू आत्राम, वैशाली कांबळे, नेताजी नेवारे, पांडुरंग बावनकर, मधू सोमनानी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.प्रदीप बोडणे यांनी तर प्रास्ताविक रामदास डोंगरवार, तर शितल सोमनानी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाकरिता वैरागड व परिसरातील बहुसंख्य नागरिक आणि कबड्डी प्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button