गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

मुक्तिपथ व पोलिस प्रशासनाच्या समन्वयातून जिल्ह्यातील दारू हद्दपार करू – पोलीस अधीक्षक नीलोत्पल

गडचिरोली : मुक्तिपथ व पोलीस प्रशासन समन्वयातून जिल्ह्यातील दारू हद्दपार करू असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले.

१२ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात मुक्तिपथ अभियान व पोलीस विभागाच्या समन्वयातून होणाऱ्या कामाची आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी मुक्तिपथचे सहसंचालक संतोष सावळकर, दारूबंदी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी तसेच सर्व तालुक्याचे तालुक्याच पोलीस निरीक्षक व बाराही तालुक्याचे मुक्तिपथचे तालुका संघटक बैठकीला उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यात बदली होऊन आलेल्या पोलीस निरीक्षकांची ओळख मुक्तिपथ तालुका संघटका सोबत करणे. प्रत्येक तालुक्यात दारूविक्री बंदी कारवाईची स्थिती काय आहे. नवीन पोलीस निरीक्षक व मुक्तिपथ मिळून आणखी नवीन रणनीती, कृती कशा पद्धतीने करता येईल. गावातील लोकांची कारवाई मध्ये मदत कशी घेतली पाहिजे. मुजोर व मोठे विक्रेते यांचेवर कारवाई करणे. इत्यादि विविध उद्देशाने या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. तालुक्यातील किती गावात सध्या दारू विक्री बंद आहे, पोलीस प्रशासना द्वारे तालुक्यातील काही गावात चांगले कामे केले गेले, यासोबतच इतर गावात बंदीसाठी कुठे सहकार्य आवश्यक आहे याची मांडणी मुक्तिपथ तालुका संघटकाने बैठकीत केली. या सर्व माहितीची नोंद घेत त्वरित कारवाई करण्याचे व अहवाल सादर करण्याचे आदेश उपस्थित सर्व पोलीस निरीक्षकांना पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले. त्रासदायक, होलसेल व वारंवार कारवाई होऊनही दारू विक्री करतात त्यांच्या तडीपारीसाठी कारवाई केली पाहिजे. ज्या गावात दारू पिणारे लोक आहेत त्यांचा उपचार मुक्तिपथ द्वारा झाला पाहिजे, लोकांमध्ये दारूची मागणी कमी झाली पाहिजे, असेही पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी यावेळी संगितले. बैठकीचे प्रास्ताविक करून आभार पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी मानले.

या बैठकी नंतर लगेच दुपारी १ ते २ यावेळेत जिल्हाभरातून आलेले पोलीस पाटील, मुक्तिपथ व वनविभाग यांची समन्वय बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस पाटलांनी व मुक्तिपथ गावसंघटना, तालुका चमू, पोलीस प्रशासन यांनी अधिक समन्वय ठेऊन काम केले पाहिजे, जेणे करून आता ज्या गावात दारूविक्री बंद आहे, त्यापेक्षा अधिक संख्येत दारूबंद असलेली गावे आपल्याला करता येईल याबाबत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सर्व पोलीस पाटलांना संबोधित केले. मुक्तिपथ द्वारा सर्व पोलीस पाटलांना आपल्या गावात काय कृती कार्यक्रम करता येईल, भूमिका व जबाबदारी, व्यसनउपचार शिबीर आयोजन इत्यादि बाबत माहितीचे पत्रक देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button