
मेळाव्याला समाज बांधवांचा उदंड प्रतिसाद
गडचिरोली : आ. डॉ. देवराव होळी विकासाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी आपल्या समाजासाठी केलेली विकासकामे खरोखरच अभिनंदनीय असून आपला ढीवर, भोई व केवट समाज आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन सकल ढीवर समाज सेवा समिती चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर यांनी चामोर्शी येथे ढीवर, भोई व केवट समाजाच्या मेळाव्याप्रसंगी केले.
चामोर्शी येथील तेली समाज सभागृहामध्ये ढीवर, भोई व केवट समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्रपरिवाराच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला आमदार डॉ. देवराव होळी यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला उपस्थित होऊन आपल्यावर प्रेम व्यक्त केल्याबद्दल समाज बांधवांचे आभार मानले.
यावेळी ढीवर, भोई समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गद्दे, शामराव राऊत, सुरेश गद्दे, संजय शिंदे, संगीता भोयर, देविदास भोयर, ठुमदेव सरपे, विलास गोहणे, देवराव वाघाडे, गुरूदास गेडाम, दिवाकर भोयर, संगीता गेडाम, ज्ञानेश्वर भोयर, मुकरू राऊत, सकल ढीवर समाज सेवा समितीचे संचालक विजय नाने, जय वाल्मिकी समाज गनपूरचे शामराव राऊत, यांचेसह मान्यवर उपस्थित होते.



