गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

युवाशक्ती गणेश मंडळातर्फे स्वच्छता मोहीम

आंतरराज्यीय पुलाची केली साफसफाई

अहेरी : येथील पॉवर हाऊस कॉलनी रस्त्यावरील युवाशक्ती गणेश मंडळातर्फे वांगेपल्ली येथील प्राणहिता नदीच्या पुलावर असलेल्या आंतरराज्यीय पुलावर स्वच्छता मोहीम राबवून साफसफाई केली.

तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या या पुलावर अनेक ठिकाणी मद्यपींनी रिकाम्या दारूच्या बाटल्या फेकल्या होत्या. शिवाय दोन्ही बाजूस गवत वाढले होते. फुटलेल्या काचांमुळे दुचाकी, चारचाकी पंक्चर होऊन अपघात घडण्याची शक्यता होती. मंडळाच्या सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवून फुटलेले काच, दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक, कपडे, गवत आदींची सफाई करून पूल स्वच्छ केला. मंडळाचे अध्यक्ष विकास उईके, उपाध्यक्ष कार्तिक कोरेत, कुणाल गाऊत्रे, कोषाध्यक्ष दुष्यंत आदे, ओमकार गुरुनुले, सल्लागार संदीप कोरेत, प्रवीण कुसनाके यांनी स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button