चंद्रपूरमुख्य बातमीविदर्भ

मध्यरात्री दोन दुकाने जळून खाक ; पाच लाखांचे नुकसान

आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला 

मूल : ताडाळा मार्गावरील घरसंसार सेल आणि सायकल स्टोअर्सला अचानक आग लागल्याने जळून खाक झाली. ही घटना शनिवारी (दि. १४) मध्यरात्री ३. ३० वाजता दरम्यान घडली. आगीची माहिती मिळताच सावली येथील अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. आगग्रस्त दुकांनाना लागूनच बऱ्याच दुकानांची चाळ आहे. आगीत सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचे समजते.

मूल शहरात ताडाळा मार्गावरील गणपती मंदिराजवळ मोहम्मद आमेर शेख यांच्या मालकीचे घरसंस्कार सेल आणि किशनलाल अरोरा यांचे श्री कृष्णा सायकल स्टोअर्स आहे. रात्री दुकान बंद केल्याने दोनही मालक आपल्या घरी निघून गेले. या दुकानांना लागूनच दुकानांची मोठी चाळ आहे. शेख यांच्या घरसंस्कार सेलमध्ये जीवनापयोगी घरगुती वस्तू स्टॉक करून ठेवल्या होत्या. किशनलाल अरोरा यांनीही श्री कृष्णा सायकल स्टोअर्समध्ये नुकताच बराच माल भरला.

मध्यरात्री ३:३० च्या सुमारास दुकानांना अचानक आग लागली. आगीचा भडका उडाल्याने काहीं नागरिकांना हे दृश्य दिसले. त्यांनी लगेच फोन करून दुकानदारांना माहिती दिली. तोपर्यंत पोलिस व सावली येथील अग्निशमक दलालाही कळविण्यात आले. आगीची घटना कळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. दलाच्या जवानांनी आग विझविली. मात्र, तोपर्यंत घरसंसार सेलमधील लाखोंच्या वस्तू जळून खाक झाल्या. श्री कृष्णा सायकल स्टोअर्स मधील सायकल व दुचाकींचे ट्यूब, टायर, हवा भरायची मशीन आणि इतर सामान जळून खाक झाले. दोनही दुकानांत सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले. पोलिसांनी शनिवारी सकाळी पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

दोन दुकानांना आग लागल्याची माहिती मिळताच आधी मूल नगर परिषदेला कळविण्यात आले. मात्र, येथील अग्निशामन वाहन वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे सावली येथील अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले. या पथकाने तत्परतेने आग विझविण्याचे काम केले. पण तोपर्यंत दोन दुकाने जळून खाक झाली होती. सकाळी सहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button