गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

सिरोंचा तालुक्यातील समस्या तत्काळ सोडवा

विविध समस्यांबाबत खा. डॉ. नामदेवराव किरसान यांना निवेदन

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील समस्या लवकर मार्गी लावण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या शिष्टमंडळाने खासदार डॉ. नामदेव किरसान यांची भेट घेऊन त्यांना या समस्यांबाबत निवेदन दिले.

सिरोंचा तालुक्यातील कोतापल्ली येथील प्राणहिता नदीवर पूल बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक वसाहत मंजूर करण्यासाठी राज्य सरकारकडे आवश्यक पाठपुरावा, तालुक्यातील अंकिसा येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करून रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, तालुक्यातील महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी सिरोंचा येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करण्यात यावे, तालुक्यातील विद्युत समस्या निकाली काढण्यासाठी विद्युत टॉवर लाईन मंजूर करून कामाला तात्काळ सुरुवात करण्यात यावी, सिरोंचा तालुक्यातील 39 ग्राम पंचायतींना विकासकामांसाठी केंद्र सरकार कडून जादा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, सिरोंचा ते आल्लापल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे कामाला वेळ लागणार असल्याने चंद्रपूर आगारातून तेलंगणा मार्गे सिरोंचासाठी बसेस सुरू करण्यात यावी, सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 100 खतांचे रुग्णालय मंजूर करून तात्काळ पदनिर्मिती करून पदे भरण्यात यावी, तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालय मंजूरीसाठी राज्य सरकारला पाठपुरावा करावा, दिवासी मन्नेवार समाजाला आदिवासी जमातीबाबतचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा इत्यादी मागण्यांचे निवेदन खा. डॉ. किरसान यांना देण्यात आले. 

यावेळी काँग्रेसचे आदिवासी सेल प्रमुख हनुमंतू मडावी, एपीएमसीचे माजी अध्यक्ष मंदा शंकर, अकुला मल्लिकार्जुन, रुपेश टिकले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश जवाजी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button