चंद्रपूरमुख्य बातमीविदर्भ

वनरक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

चंद्रपूर : चंद्रपूर वन विभागातील कोठारी वनपरिक्षेत्रात कार्यरत वनरक्षक शशिकांत श्रीहरी घरझाडे (२९) यांनी भाड्याचे घरातील पंख्याला दुपट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

वनरक्षक शशिकांत घरझाडे मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील रहिवासी असून २०१५ पासून वनविभागात कार्यरत आहे. कोठारी वनपरिक्षेत्रात शशिकांत घरझाडे वनरक्षक पदावर मागील चार वर्षांपासून कार्यरत होते. त्यांच्याकडे कोठारी क्षेत्रातील झरण मध्यवर्ती रोपवाटीकेची जबाबदारी होती. मात्र, अनियमित कार्यप्रणालीमुळे त्यांच्याकडून रोपवाटीकेचा कार्यभार काढून घेण्यात आला. दरम्यानच्या काळात दारूचे व्यसन जडल्यामुळे पत्नी त्रास्त होऊन मुलीसह गावाकडे निघून गेली होती. ते कोठारी विश्राम गृहाजवळ किरायाच्या खोलीत वास्तव्यास होते. सोमवारी सकाळी त्यांचा एक सहकारी वैद्यकीय तपासणी करण्याचे पत्र देण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. त्याने पत्र घेतले त्यानंतर संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास सहकाऱ्यांनी खोलीवर जाऊन आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याने त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता शशिकांत गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले.

सदर माहिती वनाधिकारी सुरेखा मुरकुटे व कोठारी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घराचे दार उघडून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी पंचनामा करून श्वविच्छेदन करण्यासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. घटनेचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button