भंडाराविदर्भ

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत दोन हजारहून अधिक लाभार्थ्यांना लाभ – मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण

भंडारा : जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत एकूण 4238 मंजूर घर असून त्यापैकी 2322 घरकुल पूर्ण झालीत, त्या पूर्ण झालेल्या घरांचा लाभार्थ्यांनी ताबा घेतला असल्याची माहिती भंडारा नगरपरिषद मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी दिली.

जिल्हा नियोजन सभागृहात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओडिसा येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या गृह प्रवेश कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यातील लाभार्थी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. कार्यक्रमात व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा नियोजन अधिकारी शशी कुमार बोरकर, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ तसेच जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजना शहरीचे सर्व लाभार्थी उपस्थित होते.

सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणानुसार पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी भागात कार्यरत आवास योजनेमध्ये जिल्ह्यात चांगली प्रगती सुरू असल्याची माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली.

पंतप्रधानांच्या ओडीसा येथून आभासी पद्धतीने प्रक्षेपित झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाचा लाभार्थ्यांनी लाभ घेतला. भंडारा जिल्ह्यात नियोजन सभागृहात देखील या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये चव्हाण यांनी ही माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button