गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

चिरेपल्ली, पत्तीगाव, कोत्तागुडम व मरनेली ही गावे आजही पक्क्या रस्त्यांपासून दूर

अनेक समस्यांबाबत नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अहेरी : संपूर्ण भारत देशात स्वांतञ्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो. तसेच देश शाश्वत विकासाचे ध्येय पूर्ण करायाला स्पर्धा करतोय तर दूसरीकडे अहेरी तालूक्यातील चिरेपल्ली, पत्तीगाव, कोत्तागुडम व मरनेली ही गावे अद्यापही विकासापासून वंचित आहेत. या गावांना जोडणारा पक्का रस्ता आजपर्यंत झालेला नाही. या गावांना पक्क्या रस्त्याने जोडण्याची मागणी चारही गावातील नागरिकांनी अप्पर जिल्हाधिकारी, अहेरी यांचेमार्फत मूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

खांदला ते चिरेपल्ली व मरनेली रस्ता मंजूर करून तत्काळ डांबरीकरण करून देण्यात यावे व त्यापूर्वी पूर्ण रस्ता दूरूस्ती करून देण्यात यावी अन्यथा आगामी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना भगवान मडावी, दूर्गा आलाम, नारायण आत्राम, नारू पेंदाम, अ‍ॅड. पंकज दहागावकर, प्रा. नामदेव पेंदाम, निलेश वेलादी, सरपंच मेडपली, तूकाराम आलाम, संजू तलांडी, दुर्गा अलाम, नारायण आत्राम, रांगा आलाम, गोपी पेंदाम, विजय मडावी, दौलात कोडापे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button