गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

गुड्डीगुडम येथे गरजू व वृद्धांना उबदार ब्लॅंकेटचे वाटप

व्हॉईस ऑफ मीडियाच्या सहकार्याने नवयुवक गणेश मंडळाचा उपक्रम

अहेरी : नवयुवक गणेश मंडळ गुड्डीगुडम द्वारा आयोजित गणेशोत्सवात १७ सप्टेंबर रोजी गरजू नागरिकांना उबदार ब्लॅंकेट वाटप करून एक सामाजिक दायित्व उपक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष अशोक पागे, सदस्य आशिष सुनतकर, सरपंच सरोजा पेंदाम, माजी सरपंच महेश मडावी, वनरक्षक बी.एम. पानेम, संघटक उमेश पेंड्याला, सामाजिक कार्यकर्ते संतोष भुजाडी, प्रतिष्ठित नागरिक व्येंकटी भोयर, संघटक रमेश बामनकर यांच्या हस्ते गरजू व वृद्धांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

नवयुवक गणेश मंडळ गुड्डीगुडमतर्फे गणेशोत्सव कालावधीत विविध कार्यक्रम घेत १७ सप्टेंबर रोजी व्हॉईस ऑफ मीडिया तालुका संघटना अहेरीच्या सहकार्याने उपलब्ध झालेले उबदार ब्लॅंकेट गावातील वृद्ध व गरजु नागरिकांना वितरित करण्यात आले. या उपक्रमाचे गावातील नाकरिकांकडून कौतुक होत आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष चेतन भुजाडी, उपाध्यक्ष चिरंजीव पल्ले, सचिव सतीश चौधरी, कोषाध्यक्ष स्वप्नील राऊत, सल्लागार सुरेश भुजाडी, सदस्य गणेश गौतुरे, मिथुन पेंदाम, साई चौधरी, प्रमोद भोयर, ओंकार चौधरी, राकेश रामगिरीवार, विकास गंगारेड्डीवार, महेश भोयर, तिरुपती भोयर, राजू भोयर, मधुकर भोयर, लक्ष्मण आलाम, सचिन आलाम, राहुल भोयर, पवन गंगारेड्डीवार, बबन भोयर, सुधाकर गंठावार, महेंद्र पल्ले, विलास भोयर, सुदर्शन पल्ले, समय्या पिट्याला, सुरेश भोयर, ओंकार भुजाडी, राकेश भोयर, विनोद रामगिरीवार, दामोदर पिपरे, विनोद चौधरी, नानाजी काटेल, रुपेश पिट्याला, सारय्या पिट्याला आदी मंडळाचे कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button