लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल

गडचिरोली : फिरते पथक वडसाचे तत्कालीन व सध्याचे पालघर जिल्ह्यातील पालीचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिवाकर कोरेवार यांच्यावर गडचिरोली पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दाखल करण्यात आला आहे.
दिवाकर रामभाऊ कोरेवार, तत्कालीन वनपरीक्षेत्र अधिकारी, फिरते पथक वडसा, सध्या नेमणुक वनपरीक्षेत्र अधिकारी, पाली वनआगार वाहा, ता. वाहा जि. पालघर व त्यांचे हाताखालील महिला सहकारी यांच्या विरोधात यापुर्वी पोलीस ठाणे कोरची येथे गुन्हा रजि. नं. ३०/२०२० भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७, १२ अन्वये तक्रारदार यांचेकडुन आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून स्वतःचे आर्थीक फायदा करीता १,७५,०००/-रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत रंगेहाथ पकडून गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यावरून आरोपीविरूध्द उघड चौकशी सुरू करण्यात आली होती.
त्या उघड चौकशीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड यांनी केलेल्या चौकशीमध्ये दिवाकर कोरेवार यांचे परिक्षण कालावधीमध्ये ज्ञात व कायदेशिर उत्पन्नापेक्षा जास्त ६६ लाख ०८ हजार ४०४ रुपये ८३.०३ टक्के एवढी अधिकची अपसंपदा मिळुन आल्याने आरोपी दिवाकर रामभाऊ कोरेवार व त्यांची पत्नी यांनी अपसंपदा संपादीत करणेकरीता प्रोत्साहन दिल्याने दोघांविरूध्द पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अप क. ६९६/२०२४ कलम १३ (१) (अ) (ब), १३ (२), १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन २०१८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचे अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी दिवाकर कोरेवार यांचे रामनगर, गडचिरोली येथील घराची लाचलुचपत विभागाच्या चमूकडुन झडती घेण्यात आली. तसेच आरोपी दिवाकर कोरेवार हे सध्या पाली वनआगार, वाडा, उपवनविभाग जव्हार ता. वाडा जि. पालघर येथे नेमणूकीस असून ते सध्या वाडा येथे राहत असलेल्या घराची अँटी करप्शन ब्युरो, पालघर चमु कडुन झडती घेण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांचे पर्यवेक्षणात पोनि शिवाजी राठोड, पोनि संतोष पाटील, सफौ सुनिल पेद्दीवार, पोहवा शंकर डांगे, पोहवा राजेश पद्मगिरवार, पोहवा किशोर जौंजारकर, पोना स्वप्नील बांबोळे, पोअं संदिप उडाण, संदिप घोरमोडे, प्रविण जुमनाके, मपोशि विद्या म्हशाखेत्री, ज्योत्सना वसाके, चापोहवा प्रफुल डोर्लीकर यांनी केली.
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी ईसम (एजेंट) कोणत्याही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशिर फी व्यक्तीरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरो, गडचिरोली यांचेशी संपर्क साधावे असे आवाहन पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर पी. ढोले यांनी नागरिकांना केले आहे.



