
खा. डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम ; रक्तदान शिबिरालाही प्रतिसाद
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तब्बल ५,००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण करण्यात आले. या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाला भावी अधिकाऱ्यांकडून व विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमादरम्यान आयोजित रक्तदान शिबिरात २५ हून अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
याप्रसंगी जमलेल्या हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार डॉ. नामदेव किरसान म्हणाले, “पुस्तके ही ज्ञानाचे अमूल्य साधन आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाला कधीही कंटाळू नये, कारण आज मिळवलेले हे ज्ञानच उद्या तुमच्या उज्ज्वल भविष्याचा पाया ठरणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी सातत्य, कठोर मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज असते.”
या सोहळ्याला आमदार अभिजीत वंजारी, आमदार रामदास मसराम, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, ॲड. दुष्यंत किरसान, जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कुसुम आलम, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, शंकरराव सालोडकर, प्रभाकर वासेकर, समशेर खान पठाण, माधव गावड, अजय लोंढे, परसराम टिकले यांच्यासह नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मेघा वरगंटीवार, नगरसेविका मनीषा खेवले, नगरसेवक नंदू कायरकर, सुनील चटगुलवार, मिलिंद खोब्रागडे, राजेंद्र बुल्ले, प्रशांत कोराम, मनोज अग्रवाल, प्रमोद भगत, अनिल कोठारे, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, हरबाजी मोरे, नीतीन राऊत, दिलीप घोडाम यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुस्तक वितरणासोबतच वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २५ हून अधिक तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. उपस्थित मान्यवरांनी पुस्तके प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत शिस्त, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याचे आवाहन केले.



