कोजबी ग्रामपंचायतचा मनमानी कारभार ; गावकऱ्यांचे अकराव्या दिवशीही आंदोलन सुरू

वैरागड : मौजा सोनपूर येथील आबादी जागेवर बाहेर गावातील व्यक्ती व गरज नसलेल्या गावातील व्यक्ती यांचे अतिक्रमण काढणे व इतर मागण्यांसाठी 20 सप्टेंबर पासून सोनपूर पेसा ग्रामसभा व गावकऱ्यांच्या वतीने बेमुदत साखळी आंदोलन सुरू असून 11 दिवसानंतरही ग्रामपंचायत प्रशासन हे निद्रावस्थेत असून आंदोलनकर्त्यांकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
आपल्या गावाच्या विकासात्मक मागण्यासाठी पेसा ग्रामसभा व ग्रामस्थ यांनी गेल्या सहा-सात महिन्यांपासून ग्रामपंचायत प्रशासन व वरिष्ठ कार्यालयांना पत्रव्यवहार करून आपल्या समस्या मार्गी लावण्यासाठी निवेदने दिली. परंतु सदर मुद्दे हे ग्राम पंचायत प्रशासनाच्या अखत्यारित येत असल्याने वरिष्ठ कार्यालयाने ग्रामपंचायत प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचे सुचविले असताना ग्रामपंचायत प्रशासन मात्र अतिक्रमणधारकांसोबत असलेले हितसंबंध जपण्यासाठी आंदोलनकर्त्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सदर प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून प्रकरण मार्गी लावावे अन्यथा पेसा ग्रामसभा व ग्रामस्थांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास या सर्व प्रकरणास ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.



